Terrorist (File Image)

कराची (Karachi)  येथील पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (Pakistan Stock Exchange) च्या बिल्डिंग वर आज, 29 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) दोन नागरिकांचा मृत्यु झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने समोर येत आहे. आज सकाळी या ठिकाणी चार दहशतवाद्यांकडून बंदूक आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या चार दहशतवाद्यांपैकी तीन जण ठार झाले आहेत तर एक अजूनही इमारतीच्या आतच आहे. ही इमारत त्वरित रिकामी करण्यात आली आहे. सुरुवातीला दहशतवाद्यांनी इमारतीच्या मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला आणि इमारतीवर अंदाधुंद गोळीबार केला होता.

प्राप्त माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात अन्य तीन जण जखमी झाले आहेत, जखमींमध्ये पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज इमारतीच्या बाहेर तैनात असलेला एक पोलिस अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. पोलिस व रेंजर्सच्या जवानांनी आजूबाजूचे परिसर सील केले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचे संचालक आबिद अली हबीब यांनी सांगितले की "दहशतवाद्यांनी बिल्डिंगच्या पार्किंग एरियामधून मार्ग काढला आणि गोळीबार सुरु केला.रेल्वे ग्राउंड पार्किंग क्षेत्रात दगडफेक केली आणि पीएसएक्सच्या मैदानाबाहेर गोळीबार केला. हबीब म्हणाले की, अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारामुळे इमारतीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.