ICJ च्या निकालानंतर कुलभूषण जाधव यांना Consular Access देण्याची पाकिस्तानने दाखवली तयारी
Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

भारतीय नागरिक आणि नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (International Court Of Justice) ने भारताच्या बाजूने कौल देत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. 17 जुलैला हेग मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना बचाव करण्यासाठी आवश्यक काऊन्सिलर अ‍ॅक्सिस (Consular Access) देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (2 ऑगस्ट) दिवशी कुलभूषण यांना Consular Accessदिला जाणर आहे. अशी माहिती पाकिस्तानी मीडियाकडून देण्यात आली आहे.  मुंबई: आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलभूषण जाधव यांच्या मित्रांचा जल्लोष

कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानातील कारागृहात आहेत. पाकिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवाद अशा दोन्ही आरोपाखाली त्यांना बलूचिस्तान येथे अटक केले. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील मिलिटरी कोर्टाने एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.

ANI Tweet

आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये 16 वकिलांनी आपली बाजू लढवली आहे. भारताकडून हरीश साळवे हे वकील आहे.