मुंबई: आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलभूषण जाधव यांच्या मित्रांचा जल्लोष
Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav ) खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालय ( International Court Of Justice) काय निर्णय देतं याकडं आज भारतासंह अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. न्यायालयाने निर्णय दिला आणि भारताने आनंद व्यक्त केला. हा निर्णय समजताच कुलभूषण जाधव यांच्या मित्रमंडळींनीही मुंबईत जोरदार जल्लोश केला. एकमेकांची गळाभेट घेत आणि आकाशात फुगे सोडत कुलभूषण यांच्या मित्रांनी जल्लोष केला. कुलभूषण यांच्या काही मित्रांनी तर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आता आम्ही मित्र मिळून रात्रभर जल्लोष करणार आहोत.

मुंबईतील परळ येथे राहात असलेल्या सिल्वर ओक इमारतीसमोर कुलभूषण यांची मित्रमंडळी आणि नातेवाईक एकत्र आले. त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. सातार येतील आणेवाडी तसेच, नेदरलँड येथील हेक येथेही लोक जल्लोष करत आहेत.

एएनआय ट्विट

भारतीय नागरिक आणि नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ( International Court Of Justice) आपला निर्णय दिला आहे. या खटल्यात भारताचा मोठा विजय झाला आहे. ICJ ने पाकिस्तानी न्यायालयाने कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav ) यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच, पाकिस्तानी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या शिक्षेचा पूनर्विचार करावा असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे. (हेही वाचा, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका)

दरम्यान, कुलभूषण जाधव यांना बचाव करण्यासाठी आवश्यक काऊन्सिलर अॅक्सीस देण्याचे आदेशही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले आहेत.