
पाकिस्तान (Pakistan) मध्ये 10 वर्षीय हिंदू (Hindu) मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अनुसार सिंध स्थित इस्लाम कोट येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्यानंतर तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. परंतु पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आबे,
सिंध येथे गेल्या दोन महिन्यांपासून मुलींचे अपहरण करण्यात येत आहे. तर पीडित तरुणीचे अपहरण केले आहे ती चौथी घटना असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा एका रेनो नावाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होती. रेनो ही कॉलेजला जात असताना तिला पळवून नेण्यात आले होते. मुलीच्या अपहरणाची बातमी ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत समितीने सोशल मीडियात जाहीर केली आहे. तसेत रेनो या तरुणीचा फोटो आणि तिच्याबाबत संपूर्ण माहिती उर्दू भाषेतून देण्यात आली आहे.(धक्कादायक! क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी आईनेच विकले पोटच्या जुळ्या मुलांना)
तसेच लाहौर येथे ननकाना साहिब क्षेत्र येथे एका शीख धर्मातील मुलीवर बंदूक धरुन तिला धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले होते. एवढेच नाही तर धर्मपरिवर्तन केल्यानंतर या मुलीचे जबरदस्तीने लग्न सुद्धा लावून देण्यात आले होते. पाकिस्तान मध्ये मुलींच्या बाबत सुरु असलेल्या अशा प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या वागण्यावर जहरी टीका केली आहे.