'होय, हे माझ्याच पतीचे लिंग', महिलेच्या सहकार्यामुळे पोलिसांची मदत, आरोपी गजाआड, लैंगिक अत्याचारग्रस्तांना न्याय
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एका महिलेच्या प्रामाणिक हेतू आणि सहकार्यामुळे पोलिसांची मोठी मदत झाली आहे. तसेच, लैंगिक अत्याचार झालेल्या लहान मुलांनाही न्याय मिळाला आहे. या प्रकरणात आरोपीला जवळपास 18 महिन्यांचा तुरुंगवास झाला आहे. इतके सगळे वाचल्यावर सहाजिक आपल्याला प्रश्न पडला असेल की, बातमिचे हेडींग नेमके असे का आहे? जाणून घ्या थोडक्यात काय घडलं नेमकं.

हेली डन नामक महिलेचा पती केम्प (पतीचे नाव) पेडोफाइल (Paedophile) वृत्तीचा होता. पेडोफाईल म्हणजे जो व्यक्ती लहान मुलांप्रती लैंगिक भावना अथवा ठेवतो अथवा लहान मुलांना पाहून ज्याच्या मनात कामुकता निर्माण होते, असा व्यक्ती. हेली डनला तिच्या पतीबद्दल सुरुवातीला माहिती नव्हते. पण एक दिवस पोलिस तीच्या घरी पतीला अटक करण्यासाठी हजर झाले.

पोलिसांना पाहून हेली डन काहीशी घाबरली. परंतू, पोलिसांनी तिच्या पतीचा गुन्हा सांगितला. यावर सुरुवातीला डेलीचा काहीसा विश्वास बसला नाही. परंतू, पोलिसांनी एकाच लिंगाचे वेगवेगळे तिला काही फोटो दाखवले. ते फोटो पाहून तिच्या लक्षात आले की हे लिंग तर तिच्या पतीचे आहे. तिने पोलिसांना तसे सांगितले देखील. हे फोटो माझ्या पतीच्या लिंगाचे आहेत.

हेली डन हिने फोटोतील लिंग ओळखताच पोलिसांनी तिच्या पतीवर असलेल्या आरोप आणि त्याने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. केम्प याने अनेक लहान मुलांना त्याच्या लिंगाचे फोटो पाठवले होते. ज्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. दरम्यान, पोलिसांनी हेलीचा पती केम्प याला अटक केली आहे. त्याला सध्या 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे.

दरम्यान, हेली डन आणि केम्प हे एका डेटींग एॅपद्वारे एकमेकांना भेटले होते. हेली आता 50 वर्षांची आहे. तर तिचा पती तिच्याहून पाच वर्षांनी लहान आहे. केम्प हा सद्या 46 वर्षांचा आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पतीला अटक झाल्यावर लेही नेम्हटले की, पोलिसांनी पतीचे कृत्य सांगितल्यावर आपल्याला धक्का बसला.