पश्चिम सीरिया( Syria) सरकारच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिसरात सीरियाई सरकार आणि त्यांचा सहकारी देश रशिया (Russia) यांच्याकडून करण्यात आलेल्या हवाई आणि रॉकेट हल्ल्यात सात मुलांसह 25 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राईट्स च्या युद्ध निरिक्षण समूहाने पश्चिम सिरियात सीरियायी सरकार आणि रशिया (Russia-Syria Air Strike) यांनी केलेल्या हल्ल्यात 25 नागरिक ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील 13 नागरिकांचा मृत्यू सोमवारी इदलिब येथील जबाला गावात झालेल्या हवाई हल्ल्यावेळी झाला. तर, इंग्लंड स्थित निरिक्षण समुहाने सांगितले की, एप्रिल अखेरीसही या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसात्मक घटना घडल्या होत्या. यात 360 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे की, हिसेंमुळे सुमारे 2,70,000 लोकांनी आपली घरं सोडली आहेत.
रशिया आणि सीरिया यांच्या संयुक्त हवाई हल्ल्यावर अमेरिकेसह अनेक देशांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. दरम्यान या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी म्हटले आह की, रशीया, सीरिया आणि हे काही अंतरापर्यंत इरान-सीरिया सिमेवर असलेल्या इदलिब परिसरात सातत्याने बॉम्बवर्षाव करत आहेत. येथे राहणाऱ्या निष्पाप लोकांची हत्या करत आहेत. अवघे जग हा नृरसंगार पाहात आहे. असे करण्याचे काय कारण आहे. असे करण्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे. असे हल्ले त्वरित बंद करा असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.