Nobel Prize for Medicine 2020: Harvey J Alter, Michael Houghton आणि Charles M. Rice यांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर
Harvey J. Alter, Charles M. Rice, and Michael Houghton received Nobel Prize in medicine (Photo Credits: Twitter)

Nobel Prize in Medicine 2020 Winners:  आज (5 ऑक्टोबर) 2020 Nobel Prize in Physiology किंवा Medicine च्या मानकर्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार Harvey J Alter, Michael Houghton आणि Charles M. Rice या तिघांना जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान Hepatitis C virus च्या संशोधनातील त्यांच्या कामगिरीसाठी यंदा त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच त्याची अधिकृत घोषणा Karolinska Institutet in Stockholm मध्ये नोबेल फोरम वर करण्यात आली आहे.

आयुष्य बदलून टाकणार्‍या Medicine, Physics, आणि Chemistry क्षेत्रातील मान्यवरांचा नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षीच या पुरस्काराच्या विजेत्यांबद्दल कुतुहल असते.

यंदा पहिलाच Medicine क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झालेला आहे.

नोबेल प्राईज ट्वीट

दरम्यान मेडिसीन क्षेत्रातील मानकर्‍यांच्या निवडीसाठी 5 जणांची टीम काम करत होती. त्यानुसार हेपिटायटीस सी च्या व्हायरसचं संशोधन करणार्‍या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 70 दशलक्ष हेपिटायटीसच्या केसेस आढळतात. तर 4 लाख जणांचा मृत्यू होतो. लिव्हरचं नुकसान करण्यास, लिव्हर कॅन्सरसाठी, लिव्हर सिरॉसिस साठी हेपिटायटीस सी हा व्हायरस कारणीभूत ठरतो.

नोबेल पुरस्कार विजेत्याला सुवर्ण पदक, 10 मिलियन Swedish kronor ची रक्कम म्हणजेच अंदाजे 1,118,000 अमेरिकन डॉलर मिळतात. मेडिसन सोबतच फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमेस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर केले जाते.