दक्षिण नेदरलँड्समधील (Southern Netherlands) एका शहराने पर्यटकांना न्यूडिस्ट समुद्रकिनारे (Nudist Beach) तसेच इतर बीचेसवर सेक्स (Sex) करण्यापासून रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या शहराचे नाव वीरे (Veere) आहे. वीरे नगरपालिकेने पर्यटकांसाठी समुद्र किनाऱ्यावर काही पोस्टर्स लावले आहेत, ज्यावर समुद्रकिनाऱ्यावर सार्वजनिक सेक्स करण्यास बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच किनाऱ्यावरील वाळूच्या ढिगाऱ्यांवरही शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे. अशा घटना टाळण्यासाठी दक्षता वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हा नियम अभयारण्य आणि इतर काही ठिकाणीही लागू करण्यात आला आहे.
इतर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी लोक नग्न अवस्थेत लैंगिक कृत्ये करत असल्याच्या तक्रारी स्थानिक सरकार, जल मंडळ आणि निसर्ग संस्थांकडे आल्या आहेत. शहराचे महापौर फ्रेडरिक शॉवनर यांनी म्हटले आहे की, वाळूचे ढिगारे स्थानिक समुदायासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. अशा सार्वजनिक ठिकाणी सेक्स केल्याने या ढिगाऱ्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच शहरातील लोकांवरही अन्याय होत आहे आणि यासोबतच शहरात सुट्टीसाठी आलेल्या इतर पर्यटकांनाही समस्या निर्माण होत आहेत.
फ्रेडरिक शॉवनर म्हणाले की, सरकार सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे. बीचवर सेक्स न करण्याबाबत पर्यटकांना तोंडी माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच आठ नवीन माहिती फलकही लावण्यात आले आहेत. दुसरीकडे, नग्नतावादी संघटना मानतात की, नग्न स्थितीत सूर्यस्नान करणे आणि बीचवर लैंगिक वर्तन किंवा सेक्स करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत व त्यांना तसेच वेगळे ठेवणे गरजेचे आहे. (हेही वाचा: Sex and Pleasure: सेक्स आणि लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण म्हणजे काय?)
संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी सेक्स करणे हे मनोरंजन नाही, यामुळे जे लोक सूर्यस्नान करण्यासाठी येतात त्यांना त्रास होतो. मात्र सरकारने पर्यटकांवर केलेल्या अशा कारवाईमुळे समुद्रकिनाऱ्याजवळील रेस्टॉरंट मालक चिंतेत आहेत. रेस्टॉरंटचे मालक मार्को विचेर्ट म्हणाले की, मी गेल्या 14 वर्षांपासून या समुद्रकिनाऱ्यावर काम करत आहे, मला कधीच ही समस्या वाटली नाही.