संभोग (Sex), समागम आणि लैंगिक संबंध अशा अर्थाने केली जाणारी कोणतीही कृती ही एक जैविक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मैथून होते. याला इंग्रजीमध्ये सेक्स असे म्हणतात. या कृतीमध्ये एक, दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या लैंगिक कृतीचा (संभोग) समावेश असतो. वन्य अथवा पाळीव प्राणी, पक्षीसुद्धा संभोग करतात. परंतू, त्याचा उद्देश केवळ पुनरुत्पादन करणे इतकाच मर्यादित असतो. मानवाच्या बाबतीत असे नसते. पुनरुत्पादकतेच्या उद्देशासोबतच तो लैंगिक सुखाचा आनंद (Sexual Pleasure) मिळविण्यासाठीही संभोग करतो.
संभोग ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये पुरुष प्रजनन अवयव (प्रायव्हेट पार्ट) स्त्रीच्या पुनरुत्पादक अवयवामध्ये (योनी) प्रवेश करवला जातो. या वेळी होणाऱ्या स्खलनातून स्त्रीच्या पुनरुत्पादक प्रणालीमध्ये शुक्रानुंचे आदानप्रदान होते आणि गर्भाधान आणि संतती निर्माण होऊ शकते. दरम्यान, सेक्स केवळ पुनरुत्पादनाची कृती म्हणून केला जात नाही. त्यात जोडीदारासोबत प्रेम, आपूलकी, आनंद आणि काहीतरी वाटून घेतल्याची भावननाही असते. अनेकदा लोक समोरच्या व्यक्तीवर जबरदस्तीनेही संभोग करतात. पण, अशा वेळी हा संभोग बलात्कार या कक्षेत येऊन कायदेशीर कारवाईचे कारणही ठरतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची/ जोडीदाराची इच्छा असेल तरच असा आनंद घेणे इष्ट. (हेही वाचा, Shocking News: नवरा जोमात बायको कोमात, आठ वर्षे संसार केला, पुरुष पती बाई निघाला; जाणून घ्या धक्कादायक घटना)
संभोग केवळ पुनरुत्पादनाशी संबंधित नाही. बरेच लोक त्यांच्या जोडीदारांशी आनंद, जवळीक आणि भावनिक संबंधासाठी लैंगिक कृती करतात करतात. यात चुंबन घेणे, स्पर्श करणे, मुखमैथून आणि वेदनादाई संभोग यासह विविध क्रियांमधून लैंगिक आनंद मिळू शकतो. यात लैंगिक खेळणी किंवा लैंगिक उत्तेजनाच्या इतर प्रकारांचाही समावेश असू शकतो.
लैंगिक आनंद हा मानवी लैंगिकतेचा एक नैसर्गिक आणि निरोगी भाग आहे. ज्याचे अनेक शारीरिक आणि भावनिक फायदे असू शकतात. तथापि, सुरक्षित आणि सक्षम लैंगिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी जोडीदाराच्या आवडीनिवडी, मनस्थिती, शारीरिक तयारी आणि भावनिक पातळीवरील समकक्षताही महत्त्वाची ठरते.