Nike Layoffs 2024: Nike स्पोर्ट्सवेअर कंपनीत कर्माचारी कपात; ओरेगॉन मुख्यालयातील 740 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Photo Credit - X

Nike Layoffs 2024 : Nike या जागतिक स्पोर्ट्सवेअर ब्रँडने आपल्या ओरेगॉन मुख्यालयातून 740 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 28 जूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजीवणी होणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात अनेक कंपन्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. याचा परिणाम आता आघाडीच्या ब्रँडवरही होताना दिसत आहे. टाळेबंदी(Layoff)चा हा निर्णय कंपनीच्या एकूण खर्चात बचत करण्याच्या धोरणाचा भाग असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा :Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात )

यूएसए टुडेच्या अहवालानुसार, नायकेने जूनच्या अखेरीस आपल्या ओरेगॉन मुख्यालयातील 740 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. Nike च्या सेलमध्ये गेल्याकाही दिवसांपासून घट झाल्यामुळे कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गे्या काही दिवसांपूर्वी गुगलमध्येही कर्मचारी कपात करण्यात आली होती. खर्च कमी करण्यासाठी, टेक जायंटने रिअल इस्टेट टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली.

या वर्षाच्या सुरुवातीपासून Nike कंपनीचे मूल्य 13 टक्क्यांनी घसरले आहे. या कर्मचारी कपातीमधून कंपनीने पुढील तीन वर्षांमध्ये सुमारे दोन अब्ज डॉलर्सची बचत करू शकेल असा अंदाज आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्येच कंपनीने त्यांच्या 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली होती. जी त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या अंदाजे दोन टक्के इतकी आहे.