नेपाळ: अतिवृष्टी आणि वादळात 27 जणांचा मृत्यू; 400 जण जखमी
Rainstorm in Nepal (Photo Credits: Twitter @yubarajlama108)

नेपाळला अतिवृष्टी आणि वादळाचा जबरदस्त फटका बसला आहे. यात 25 लोकांचा मृत्यू झाला असून 400 लोक जखमी झाले आहेत. हिमालय टाईम्सच्या वृत्तानुसार, नेपाळच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांना वादळचा फटका बसला. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी या नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्या कुंटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी हे वादळ बारा आणि परसा जिल्ह्यात धडकले. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2 एमआय 17 हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.

ANI ट्विट:

वादळामुळे अनेक गावातील झाडे आणि वीजेचे खांब कोसळले. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून नेपाळ पोलिस आणि आर्मीकडून बचावकार्य सुरु आहे. यासाठी सुमारे 100 हून अधिक सैनिकांची टीम कार्यरत आहे.