अमेरिकन स्पेस एजंसी नासा (NASA) च्या आजच्या ऐतिहासिक उड्डाणाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र वातावरण अनुकूल नसल्याने स्पेस एक्सचं (SpaceX) पहिलं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. स्पेसएक्सचं एक रॉकेट नासा चे पायलट डग हर्ली (Douglas Hurley)आणि बॉब बेनकेन(Bob Behnken) यांच्या सोबत ड्रॅगन कॅप्सुलसोबत बुधवारी केनेडी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून (Kennedy Space Center) उड्डाण करणार होते. हा असा पहिला प्रसंग होता जेव्हा सरकारशिवाय एखादी खाजगी कंपनी अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवणार आहे.
नासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता हे उड्डाण शनिवार, 30 मे दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाईल. लॉन्चिंगच्या काही वेळ आधी ही माहिती देण्यात आली. दरम्यान आता 30 मे दिवशी दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी हे उड्डाण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल.
नासा ट्वीट
Today’s launch was scrubbed due to weather. There were no issues with the @SpaceX Falcon 9 rocket and Crew Dragon spacecraft. The next launch attempt is Saturday, May 30 at 3:22 p.m. ET. #LaunchAmerica More photos from today: https://t.co/8due5jBg5Y pic.twitter.com/wvvd3WcnWz
— NASA HQ PHOTO (@nasahqphoto) May 27, 2020
उड्डाणासाठी सज्ज होणारे अंतराळवीर
✔️ Strapped in
✔️ Ready for the ride#LaunchAmerica pic.twitter.com/qJeBMFEWvS
— NASA (@NASA) May 27, 2020
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनीदेखील ट्वीटरच्या माध्यमातून नासा आणि स्पेसएक्सच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. दरम्यान शनिवारी पुन्हा प्रयत्न केल्या जाणार्या उड्डाणासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दरम्यान कालच्या प्रक्षेपणाचं अनुभव घेण्यासाठी अनेक अमेरिकन वासियांनी गर्दी केली होती.
अमेरिकेमध्ये 9 वर्षांनंतर आता अंतरिक्ष एजंसी नासा त्या6च्या कमर्शिअल क्रु प्रोग्रामला पुन्हा सुरूवात करत आहे. जर हा प्रयत्न यशस्वी ठरला तर अवकाशामध्ये अंतराळवीरांना पाठवण्यासाठी अमेरिकेला रशिया किंवा युरोपियन देशांवर अवलंबून रहावं लागणार नाही.