Bhavya Lal, भारतीय वंशाच्या अमेरिकन ची NASA च्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्ती
Bhavya Lal (Photo Credits: Twitter/ANI)

अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता नासा (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्यकारी प्रमुख पदावर भव्या लाल (Bhavya Lal)  या भारतीय वंशाच्या अमेरिकनची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती जो बायडन यांनी केल्याने अनेक भारतीयांची छाती अभिमानाने पुन्हा फुलली आहे. अमेरिकेच्या सत्तेचं केंद्रस्थान असलेल्या व्हाईट हाऊस कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भव्या लाल सोबतच इतर नासा मधील प्रमुख पदांवरील नियुक्तांची देखील घोषणा करण्यात आली आहे. Joe Biden यांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच अमेरिकन प्रशासनात 20 भारतीय-अमेरिकन लोकांना स्थान.

भव्या लाल यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे. यापूर्वी भव्या लाल या नासाच्या इनोव्हेटीव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्राम मध्ये सल्लागार समितीच्या सदस्य होत्या. त्यांनी इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये देखील 15 वर्ष रिसर्च स्टाफ म्हणून काम केले आहे. भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मेसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राच्या संचालक पदी काम केले आहे.

अमेरिकेमध्ये भव्या लाल यांनी न्यूक्लिअर सायन्स या विषयात बीएससी आणि एमएसस्सीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर सार्वजनिक प्रशासन या विषयामध्येही भाव्या यांनी डॉक्टरेटचं शिक्षण घेतलं आहे.