तहव्वुर राणा (Photo Credits-Twitter)

मुंबईत 2008 रोजी 26/11 या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजिल्स मधून अटक करण्यात आली आहे. 59 वर्षीय राणा याला या प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात राणा याला प्रकृती बिघडल्याने आणि कोरोना व्हायरसमुळे तुरुगांतून सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. राणा याला आतापर्यंत दोन वेळा अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला लॉस एंजिल्स येथे ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता राणा याचे प्रत्यार्पण भारतात करण्यात येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या वकिलांनी शुक्रवारी असे म्हटले आहे की, शिकागो मधील दहशतवादी तहव्वुर राणा याला दहशतवाद्यांचे समर्थन केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि त्याची ही शिक्षा 2021 पर्यंत होती 2008 मध्ये दहशतवादी हल्ल्याकेल्यानंतर लॉस ऐंजिल्स मधून राणा याला अटक करण्यात आली होती. मुंबईतील 26/11 च्या या हल्ल्यामध्ये 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.(India-China Clash: पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारला शिवसेनेचा टोला, 'पंडित नेहरु यांना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल')

मूळचा पाकिस्तानी असलेला कनाडाई तहव्वुर राणा याला 26/11 च्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी आरोपी घोषित करण्यात आले होते. राणा याला 2013 मध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर मुंबईतील दहशतवादी हल्ला लश्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी केला होता. त्यानंतर यामधील एक दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यास यश आले होते. कसाब याला 21 नोव्हेंबर 2012 मध्ये पुण्यातील येरवडा तुरुगांत फाशी देण्यात आली होती.