US Shocker: पैशांसाठी अवघ्या 10 वर्षांच्या पोटच्या लेकीला विकण्याचा प्रयत्न; आरोपी आईला पोलिसांकडून अटक
Jail Pixabay

US Shocker: पैशांसाठी अवघ्या  10 वर्षांच्या मुलीला तिच्या आईकडून विकण्याचा(Sell) प्रयत्न करण्यात आल्याची एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा(Florida)मधून उघडकीस आली आहे. पोलिसांनी 32 वर्षीय महिलेला अटक केली असून तिच्यावर बाल शोषण, अल्पवयीन मुलांची विक्री अंतर्गत कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा:US Horror : आईच्या हलगर्जीपणामुळे 4 वर्षाच्या निरागस मुलीचा मृत्यू; मधूमेह असूनही आहारात शितपेयाचा वापर, 9 वर्षाचा कारावासाची शिक्षा )

जॅक्सनविल शेरीफच्या कार्यालयालातील एका अहवालातून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुलीला किती पैशांमध्ये विकले या आकड्यांमध्ये काहीशी विसंगती आहे. फ्लोरिडाच्या जॅक्सनव्हिल भागात अल्पवयीन मुलीला विकण्याचा प्रयत्न झाला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, महिलेने तिच्या मुलीला फक्त 5 डॉलरच्या बदल्यात पुरुषासोबत शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याची डिल केली होती.

Fox35orlando मधील एका अहवालानुसार, महिलेच्या घरा जवळ बालवाडी शिक्षिक अन्न देण्यासाठी येत असताना महिलेला भेटले, त्याने महिलेला सांगितले की, 'तिला तुझ्यासोबत घेऊन ये. त्या हदल्यात $20 मिळतील.'

जेव्हा पोलिसांनी महिलेला अटक केली तेव्हा त्यांना 10 वर्षांची मुलगी हताश अवस्थेत आढळली. ती रडत होती, भुकेल्या अवस्थेत होती, तिने अनेक दिवस आंघोळ केली नसल्यासारखे दिसत होते. अल्पवयीन मुलीची अवसेथा पाहून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिस सध्या घटनेचा तपा करत आहेत. महिलेवर बाल शोषण आणि अल्पवयीन मुलाची विक्री प्रकरणात अनेक आरोपांत अटक करण्यात आली आहे.