Monkey Terror in Yamaguchi City: जपानमधील यामागुची शहरात माकडांची दहशत, मुलांना पळवणे, हल्ला करण्यासारख्या उच्छादांनी नागरिक त्रस्त (पाहा व्हिडिओ)
Monkey Terror in Yamaguchi city | (Photo Credit - Twitter)

जपानमधील (Japan) एका शहरात चक्क माकडांनी धुमाकूळ (Monkey Terror) घातला आहे. यामागुची (Yamaguchi) असे या शहराचे नाव आहे. या माकडांनी शहरात  इतका उच्छाद मांडला आहे की, नागरिकांना आपली बाळे, लहान मुले सांभाळून ठेवावी लागत आहेत. इतकेच नव्हे तर खिडक्यांची तावदानेही ओढून खिडक्या बंद कराव्या लागत आहे. शहरातील नागरिक या मर्कटलिलांनी चांगलेच वैतागले (Monkey Terror in Yamaguchi City) आहेत. मोकाट माकडे रस्त्यांवरुन फिरत आहेत. शहरांतील झाडे, पार्क केलेली वाहने आणि नागरि वस्त्यांमध्येही ही माकडे टोळ्यांनी फिरत आहेत. नागरी परिसरात आलेली माकडे अचानकपणे रस्त्यांवर, घरांच्या गच्चीवर, सोसायट्यांमध्ये येत आहेत. नागरिकांच्या हाता पायांना आणि दिसेल त्या आवयवला ते कडकडून चावा घेत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षेचाच प्रश्न

खास करुन नागरिकांना या माकडांपासून आपल्या लहान बालकं आणि मुलांना सांभाळावे लागत आहे. ही माकडे या मुलांना आपल्या सोबत घेऊन जातात. त्यांना खेचतात. ही मुले जशी आपलीच आहेत असे ही माकडे समजत आहेत. त्यामुळे या माकडांपासून बचाव कसा करायचा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाने वेळीच पावले टाकून माकडांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.  (हेही वाचा, Shocking! 2 महिन्यांच्या बाळाला उचलून घेऊन गेले माकड; पाण्याच्या टाकीत टाकले, मुलाचा मृत्यू )

व्हिडिओ

प्राप्त माहितीनुसार, 8 जुलै पासून 25 जुलै पर्यंत माकडांनी जवळपास 58 नागरिकांना चावा घेऊन आणि हल्ला करुन जखमी केले आहे. शहर प्रशासनाने माकडांनी आटोक्यात आणण्यासाठी ट्रँक्विलायझर गनने प्राण्यांची शिकार करण्यासाठी एक विशेष युनिट नेमले आहे. धक्कादायक असे की, माकडांना अन्नात रस नाही, म्हणून सापळे काम करत नाहीत. त्यांनी मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांना लक्ष्य केले आहे.