मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल एलन यांचे निधन ; अनेक वर्ष सुरु होती कॅन्सरशी झुंज
पॉल एलन यांचे निधन ( Photo Credit: ANI )

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक पॉल एलन यांचे सोमवारी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. एलन यांनी बालमित्र बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पॉल यांचा कॅन्सरशी सामना सुरु होता. 2009 मध्ये झालेल्या कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे त्यांनी याच महिन्यात सांगितले होते.

वॉल्कन इंकनुसार, एलन यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. पॉल एलन यांच्या निधनानंतर यांच्या निधनानंतर त्यांची बहिण जॉडी यांनी सांगितले की, "ते प्रत्येक बाबतीत अगदी अनोखे होते. अनेक लोक त्यांना टेक्नोलॉजिस्ट आणि परोपकारी म्हणून ओळखले जाते. ते माझे भाऊ असण्याबरोबरच एक चांगले मित्र देखील होते."

तर पॉल एलन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सांगितले की, "मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक म्हणून त्यांनी अनेक जादूई उत्पादनं, अनुभव दिले. असे करत असताना त्यांनी जगाला बदलून टाकले."

वॉल्कन इंकचे सीईओ बिल हिफ यांनी सांगितले की, "आमच्यापैकी ज्या लोकांनी एलन यांच्यासह काम केले आहे त्यांच्यासाठी हा जबर धक्का आहे. त्यांनी जगातील सर्वात कठीण प्रसंगांना सामोरे जात ध्येय गाठले होते."

पॉल एलन आणि बिल गेट्स यांनी 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पची स्थापना केली होती. त्यामुळे एक नवा बदल जगासमोर आला. आयबीएम कॉर्पने पर्सनल कंम्प्युटरच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा 1980 साली मायक्रोसॉफ्ट कंपनी माईलस्टोन ठरली होती.