अमेरिकेतील मिशगन (Michigan) येथून बेपत्ता झालेली दोन वर्षांची चिमूकली रहस्यमयरित्या सापडली आहे. पाठीमागील काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. धक्कादायक म्हणजे तिच्या घरातील दोन कुत्रेही तिच्यासोबत होते. यापैकी एका कुत्र्याला उशाखाली घेऊन झोपलेल्या आवस्थेत ती एका दुर्गम परिसरात आढळून आली. स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सदर मुलगी राहत्या घरातून बुधवारी रात्री बेपत्ता झाली होती. ती गायब झाल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली व कसून शोध घेण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी ड्रोन आणि माग काढणाऱ्या कुत्र्यालाही सोबत घेतले आणि स्थानिक नागरिकांसह परिसर पिंजून काढला.
दूर्गम परिसरात मुलीचा शोध बराच काळ सुरु होता. अखेर काही तास उलटून गेल्यानंतर बेपत्ता मुलगी आरामात झोपलेल्या आवस्थे आढळली. गंमत म्हणजे तिने सोबतचा कुत्रा उशाखाली घेतला होता. दुसरा कुत्राही तिच्या उजव्या बाजूस पाहारा देत बसला होता. तपासप्रमुख असलेल्या लेफ्टनंट मार्क गियानुन्झिओ यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, खरोखरच ही एक अद्भूत कहाणी आहे.
तिसा चेसा (Thea Chase) असे या मुलीचे नाव आहे. बुधवारी सकाळी ती Faithorn येथून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पीपल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राहत्या ठिकाणापासून जवळपास तीन मैल अंतरावर ती आढळून आलाी. पोलिसांनी सांगितले की, सध्या तीला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.