Nagpur Police | (Photo Credits: Twitter/ANI)

Missing Children Case Nagpur: नागपूर (Nagpur) येथून बेपत्ता झालेल्या तीन मुलांचा अखेर शोध लागला आहे. सकाळी खेळायला म्हणून घरातून बाहेर पडलेली ही मुले सध्याकाळ होऊनही घरी परतली नव्हती. त्यामुळे पालकांच्या मनात बालकांचे अपहरण (Panchpavali Police Station) झाल्याची चिंता होती. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तौफिक फिरोज खान (वय 4 वर्षे), आलिया फिरोज खान, आफरीन ईरशाद खान (दोघांचेही वय 6 वर्षे) अशी तीन मुले अचानक गायब झाल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली होती. अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दरम्यान, या मुलांचे मृतदेह का कारमध्ये आढळून आले. या तिनही मुलांचा मृत्यू झाला आहे. ही मुले खेळता खेळता कारमध्ये गेली असावीत आणि दरवाजा लॉक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगरमध्ये तीन बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले. खेळता खेळता ही मुले कारमध्ये बसली आणि त्यांनी दरवाचा आतून लॉक केला. ज्यामुळे त्यांना श्वास घेता आले नाही. श्वास गुदमरल्याने उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, मृतांपैकी दोघे जण ही भावंडे आहेत तर सहा वर्षांची मुलगी ही त्याची मैत्रिण आहे. तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. (हेही वाचा, Mumbai Crime News: मुलीला जन्म दिल्याने नाराज पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले; ऑटो-रिक्षा चालकाने वाचवला पीडितेचा जीव)

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, बेपत्ता झालेली तीनही मुले नागपूर येथील पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगर परिसरातील टेका नाका येथे फारुक मैदानावर खेळत होते. सकाळी खेळायला गेलेही ही मुले सायंकाळ झाली तरी घरी परतली नव्हती. त्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, मुलांचा कोणताही पत्ता न लागल्याने पोलकांनी पोलिसांत जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुर केला. मात्र, 24 तास उलटले तरी पोलिसांना मुलांचा शोध लागला नाही. मग पोलिसांनी समाजमाध्यमांमधून या तिनही मुलांची छायाचित्र प्रसारित केली आणि कोणाला काही सुगावा, पत्ता लागला तर संपर्क करण्याचे अवाहन केल. मात्र, कोणताच सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी अखेर पुन्हा शोध सुरु केला. मुलांचे वय पाहता ती अगदीच लहान असल्याने खूप दुर गेली नसावीत यावर पोलिसांचा विश्वास होता. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पातळीवरच शोध सुरु केला असता ही मुले एका कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मत घषीत केले.