Viral Video: प्रियकराचा प्रेयसीला अनोखा प्रपोज, हवामानशास्त्रज्ञ मेरी लीला बॉयफ्रेंडने ऑन-एअर दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ व्हायरल
Meteorologist Mary Lee (Pic Credit - Twitter)

व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's day) दिवशी प्रियकराने (Lover) एका प्रेयसीला  आश्चर्याचा धक्का दिला. प्रियकराने असा अनोखा प्रपोज केल्याने हवामानशास्त्रज्ञ मेरी लीला (Meteorologist Mary Lee) तिचे अश्रू आवरता आले नाहीत. CBS सॅन फ्रान्सिस्को बे एरिया हवामानशास्त्रज्ञ मेरी ली जेव्हा नॉर्दर्न लाइट्सच्या (Northern Lights) एका भागाची माहिती ऑनलाइन देत होती. तेव्हा तिचा प्रियकर अजित निनानने (Ajit Ninan) तिला ऑन-कॅमेरा प्रपोज केले. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाले आहे. CBS सॅन फ्रान्सिस्कोच्या मते, मेरी ली KPIX 5 स्टुडिओमध्ये हवामानाची माहिती देत ​​होती. जेव्हा तिच्या प्रियकराच्या मुली मिरियम आणि मॅडी गुलाब घेऊन सेटवर आल्या.

लीला सुरुवातीला वाटले की ही एक आश्चर्यकारक कौटुंबिक भेट आहे. परंतु जेव्हा अजित निनानने तिच्यासमोर गुडघे टेकले आणि तिला अंगठी भेट दिली तेव्हा तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. अजित निनान लीला म्हणाले, मेरी, तू माझी नॉर्दर्न लाइट्स आहेस. तू अप्रतिम आणि सुंदर आहेस, मुली तुझ्यावर प्रेम करतात आणि मीही तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्या आयुष्याचा एक भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. तू कायमची राहशील का? तू माझी होशील का? आणि तू माझ्याशी लग्न करशील?

लीसाठी हा प्रस्ताव आणखी खास होता कारण तिला नेहमीच नॉर्दर्न लाइट्ससमोर काम करायचे होते. हे फुटेज हजारो वेळा ट्विटरवर पाहिले गेले आहे. अनेकांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे आणि अनेकांनी अजित निनानचे शानदार प्रपोजसाठी अभिनंदन केले आहे.