New Year 2019 : Melbourn, Sydney पासून दुबईतील Burj Khalifa येथील नववर्ष आतिषबाजी येथे पाहा Live
Melbourne fireworks (Photo Credits: Pixabay)

New Year 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जगभरात जय्यत तयारी सुरु आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त परदेशात अनेक ठिकाणी होणारी फटाक्यांची आतिषबाजी अत्यंत प्रेक्षणीय असते. त्यापैकी सिडनी (Sydney) आणि मेलबर्न (Melbourn) या ठिकाणी नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी फटाक्यांची आतिषबाजी लोकप्रिय आहे. तुम्हालाही हा आनंदोत्सव घरबसल्या अनुभवता येईल.

यंदा सिडनीत न्यू ईअर हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी तब्बल दहा लाखांहून अधिक लोक दाखल झाले आहेत. ही नविन वर्षाची आतिषबाजी ही स्वर्गीय राणी आरेथा फ्रँकलिन (Aretha Franklin) आणि ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ठिकाणांसाठी मानवंदना असते. यात वेगवेगळे प्राणी, पक्षी, झाडे, मासे यांचे अॅनिमेटेड प्रोजेक्शन प्रदर्शित केले जातील. 'या' कारणामुळे जगात 1 जानेवारीला नवीन वर्षाचा आनंद साजरा करतात!

रिपोर्ट्सनुसार, मेलबर्न शहरातील आतिषबाजीची व्यवस्था ही 22 इमारतींच्या वरच्या मजल्यावरुन करण्यात आली आहे. ही भव्य आतिषबाजी अनुभवण्यासाठी मेलबर्न सीबीडीमध्ये तब्बल 3.5 लाख लोक जमणार आहेत. या आतिशबाजीसाठी तब्बल 2,34,000 अमेरिकी डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. हा संपूर्ण लाईट शो तयार करण्यासाठी कामगार एका आठवड्यापासून अधिक काळ काम करत होते. रॅपर अॅडम ब्रिग्सच्या संगीताने नटलेला हा लाईट शो 10 मिनिटांचा असेल. गूगल डूडलवरही 31 डिसेंबर 2018 च्या नाईट्चं खास सेलिब्रेशन!

ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे. त्यामुळे ही भव्य आतिशबाजी तुम्हाला 31 डिसेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता पाहायला मिळेल. हा लाईट शो सुरळीत पार पडण्यासाठी कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसंच या इव्हेंटमधून 8.6 मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई होण्याची अपेक्षा आहे.

सिडनी, मेलबर्नसोबतच जगातील सर्वात उंच इमारत दुबई येथील बुर्ज खलिफा (Burj Khalifa) येथेही आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात उंच इमारत दुबई येथील बुर्ज खलिपा येथेही आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. सुरक्षिततेचा विचार करुन लेझर शो चे आयोजन करण्यात आले आहे. बुर्ज खलिफा येथील आतिषबाजी 31 डिसेंबर 2018 ला 11:57 मिनिटांनी सुरु होईल. या शो पाहण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करतील.

जगभरातील नववर्ष स्वागताची आतिषबाजी येथे पाहा...

या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे तुम्ही जगभरातील नववर्ष स्वागताचा जल्लोष घरबसल्या अनुभवू शकता.