इंग्लंड देशाच्या राजघराण्याला नवा वारस मिळाला आहे. इंग्लंडचा राजकुमार हॅरी (Prince Harry) याची पत्नी मेगन मार्केल (Meghan Markle) हिने नुकताच एका बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म देण्यासाठी सोमवार (06 मे 2019) रोजी शाही रुग्णालयात पोहोचली होती. रुग्णालयात पोहोचल्यावर काही वेळातच मेघन मार्केल हिने एका मुलाला जन्म दिला. राजकुमार हॅरी आणि मेघन मार्केल यांचे हे पहिलेच अपत्य आहे.
आपण आई-बाबा झाल्याची बातमी राजकुमार हॅरी आणि मेगना मार्केल दाम्पत्याने सोमवारी दुपारी (स्थानिक वेळेनुसार) दिली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मेगना मार्केल हिने जन्म दिला तेव्हा बाळाचे वजन 7 पाऊंड 3 औंस इतके होते.
आई-बाबा झाल्याची ही आनंदाची बातमी सांगताना राजकुमार हॅरीने म्हटले की, मी आता चंद्रावर आहे. प्रत्येक आईवडीलांप्रमाणे आमचे बाळही अद्भुत आहे. प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स विल्यम, प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस चार्लोट, प्रिन्स लूईस आणि प्रिन्स हॅरी नंतर हे बाळ इग्लंडच्या राजघराण्याच्या वारसाच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर असणार आहे. (हेही वाचा, अबब! ३८ मुलांची आई आहे ३९ वर्षांची महिला, १३ व्या वर्षी दिला होता पहिल्या बाळाला जन्म)
राजपुत्र विल्यम आणि मेघन मार्केल यांनी मे 2018 मध्ये विवाह केला होता. या विवाहाची जगभर चर्चा झाली होती. तसेच, या विवाहासाठी जगभरातील देशांतून पाहुणे उपस्थित होते. इग्लंडच्या राजघराण्याला नवा वारस मिळणार असल्याची बातमी मुद्दामहून गुप्त ठेवण्यात आली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजघराण्याला वारस मिळणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून आली होती.