Mass Shooting At Alabama: अमेरिकेतील अलाबामा (Alabama) राज्यातील बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सामूहिक गोळीबाराची (Mass Shooting) घटना समोर आली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. बर्मिंगहॅम पोलिस विभागाने X वर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, 'अधिकारी गोळीबाराच्या घटनेच्या ठिकाणी असून या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबाराची घटना शहरातील फाइव्ह पॉइंट्स साउथ भागात झाली.'
बर्मिंगहॅम पोलिस फाइव्ह पॉइंट्स साउथ शेजारी घडलेल्या गोळीबाराचा तपास करत आहेत. ज्यात शनिवारी रात्री उशिरा चार लोकांचा मृत्यू झाला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या घटनेत अनेक शूटर्सचा हात असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे. या गोळीबारात दोन पुरुष आणि एका महिलेला गोळी लागली. त्यांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले. तसेच आणखी एका जखमी व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. (हेही वाचा - Mass Shooting in US: अमेरिकेच्या ओहायो प्रांतात गोळीबाराचा थरार; एक ठार, 26 जखमी (Watch Video))
अमेरिकेतील अलाबामा येथे सामूहिक गोळीबार, पहा व्हिडिओ -
#JUSTIN : 4 dead, dozens injured following mass shooting near downtown Birmingham, Alabama#Birmingham #Birmingham #UK #Shooting #UnitedKingdom #Alabama pic.twitter.com/vYYUn4Je4n
— upuknews (@upuknews1) September 22, 2024
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तेथे अनेक शूटर होते, परंतु कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. स्थानिक पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये सांगितले की, आठ जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आणि बर्मिंगहॅममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.