Pacific Palisades (Photo Credits: X/ Brianna Sacks @bri_sacks)

Los Angeles Wildfire: दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे भीषण आग (Fire) लागली आहे. बघता बघता आता या आगीने भीषण उग्र रूप धारण केले आहे. यामुळे हजारो लोकांना निवासी भागातून इतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पश्चिम लॉस एंजेलिसच्या पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये 2 चौरस मैलांपेक्षा जास्त जंगलाला ही आग लागली आहे. डोंगराळ भागात लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागत आहे. पॅसिफिक पॅलिसेड्स हे अनेक हॉलिवूड स्टार्सचे घर आहे. लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाचे अग्निशमन प्रमुख क्रिस्टिन क्रॉली यांनी सांगितले की, 10,000 हून अधिक घरांमध्ये आणि 13,000 हून अधिक इमारतींमध्ये राहणारे सुमारे 30,000 लोक आगीमुळे प्रभावित झाले आहेत.

या भीषण आगीमुळे रस्ते ठप्प झाल्याने मोठ्या संख्येने लोक आपल्या गाड्या सोडून पायी सुरक्षित ठिकाणी जात आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वाढली आहे. या आगीत अनेक घरे जळून खाक झाली. अधिका-यांनी या आगीत किती वास्तूंचे नुकसान झाले किंवा नष्ट झाले याची नेमकी संख्या जाहीर केली नाही. आगीचे कारण त्वरित कळू शकले नाही. कॅलिफोर्नियातील लाखो लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Los Angeles Wildfire:

आग कशी पसरली?

कोरड्या हंगामानंतर जोरदार वाऱ्यामुळे आग लागण्याचा धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. या वाऱ्यांमुळे आग आणखी भडकली आणि काही तासांत ती वेगाने पसरली. रात्रीच्या वेळी जोरदार वाऱ्यामुळे आग इतर भागात पसरण्याची शक्यता होती. नॅशनल वेदर सर्व्हिसने मंगळवार ते गुरुवारपर्यंत लॉस एंजेलिस काउंटीसाठी 'अत्यंत आगीचा धोका' इशारा जारी केला. त्यांनी ताशी 50 ते 80 मैल वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली होती. (हेही वाचा; Tibet Earthquake: तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर चीनच्या वादग्रस्त धरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह)

बचाव कार्य-

या भागात सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानातून समुद्रातून पाणी घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उरलेली वाहने काढण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला, जेणेकरून आपत्कालीन वाहने जाऊ शकतील. राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे की बुधवारी सकाळी जोरदार वारे परिस्थिती बिघडू शकतात.