Kulbhushan Jadhav Case: आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात
Kulbhushan Jadhav Case (Photo Credits: ANI)

Kulbhushan Jadhav Case in ICJ: पाकिस्तानच्या कैदेमध्ये असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav)  यांच्याप्रकरणाची आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात ( International Court of Justice) सुनावणी होणार आहे. नुकताच 14 फेब्रुवारीला भारताचया CRPF जवानांवर जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad ) या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केल्यानंतर पाकिस्तानवर भारतासह जगभरातून टीका होत आहे. पाकिस्तानावरील वाढत्या दबाव्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाच्या सुनावणीकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट

कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानामध्ये कैदेत ठेवण्यात आले आहे. एप्रिल 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायलयात धाव घेतली. 18 मे 2017 रोजी त्यांच्या शिक्षेवर स्थगिती मिळवण्यास भारताला यश आले.द हेगमध्ये आजपासून कुलभूषण जाधव प्रकरणाविषयी सुनावणी होईल. 18 फेब्रुवारी म्हणजे आज हरिश साळवे आपली बाजू मांडणार आहेत. तर उद्या पाकिस्तानकडून खावर कुरेशी आपली बाजू मांडतील. 21 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालू राहील. त्यानंतरकाही महिन्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

लाइव्ह सुनावणीची सोय

कुलभूषण जाधव या खटल्याची सुनावणी लाइव्ह पाहण्याची सोय खुली करण्यात आली आहे. इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत न्यायालयाच्या वेबसाइटवरून तसेच संयुक्त राष्ट्रांच्या ऑनलाइन टीव्ही चॅनेलवरून या खटल्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.