
संसार म्हटले की चढउतार आले, वादविवाद आले, तडजोड आली. या सर्व गोष्टी जे निभावून नेतात त्यांचेच नाते पूर्णत्वाला जाते. मात्र कधी कधी गोष्टी हाताबाहेर जातात आणि नाईलाजाने आपल्याला ते नाते थांबवावे लागले. मात्र याही पुढे जाऊन नव्याने आयुष्य सुरु करणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या केंटुकी (Kentucky) येथे राहणाऱ्या 31 वर्षीय एरिका क्विगलनेही (Erica Quiggle) असेच केले, परंतु तिने दुसर्या कोणाला नव्हे तर आपल्या सासऱ्याला आपला जीवनसाथी बनवले आहे. क्विगलचा, नवरा जस्टिन टॉवले याच्याशी घटस्फोट झाला होता, त्यानंतर तिने तिच्या 60 वर्षांच्या सावत्र-सासऱ्याशी लग्न केले. सध्या सोशल मिडियावर या लग्नाची बरीच चर्चा आहे.
‘द सन’ च्या अहवालानुसार एरिका क्विगलचे वयाच्या 19 व्या वर्षी जस्टीन टॉवेल या स्थानिक कारखान्यातील कामगाराशी लग्न झाले होते. पुढे या दोघांनाही मूलही झाले. परंतु दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. परस्पर वादामुळे 2011 मध्ये त्यांचे संबंध दुरावले. त्या दरम्यान एरिकाचे सावत्र सासरे जेफ क्विगल यांनी तिला मोठा आधार दिला. हळूहळू हे दोघे जवळ आले. 2017 मध्ये जेव्हा एरिका आणि जस्टीनचा घटस्फोट झाला तेव्हा सावत्र सासरच्यांनी एरिकासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. एरिकाने काही काळ हा प्रस्ताव मान्य केला नाही, परंतु त्यानंतर तीने यासाठी होकार दिला.
आता वयात 29 वर्षांचे अंतर असूनही जेफ आणि एरिका दोघेही पती-पत्नी म्हणून आपले जीवन व्यतीत करत आहेत. लग्नाच्या एका वर्षातच एरिका क्विगलने एका मुलीलाही जन्म दिला. आता दोन्ही मुले त्यांच्या आईसमवेत राहतात. आपल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत एरिकाने सांगितले की, ‘मी जेफला माझा पूर्वीच्या पती जस्टिनच्या बहिणीच्या माध्यमातून ओळखते. जेव्हा त्यांनी मला कठीण काळात सपोर्ट केला, तेव्हा मला वाटले की आमची जोडी चांगली जमू शकेल.’ (हेही वाचा: Taiwan: काय सांगता? ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट)
दरम्यान, एरिकाचा पहिला नवरा जस्टिननेही दुसरे लग्न केले आहे आणि दोघेही आपल्या पहिल्या मुलाची कस्टडी शेअर करत आहेत. ही दोन कुटुंबे शेजारीच वेगवेगळ्या घरात राहतात.