Bek Air Plane (Photo Credits: Twitter/@H_Aram)

Kazakhstan Plane Crash: कजाकिस्तान ( Kazakhstan) देशातील अल्माटी (Almaty Airport) विमानतळावरुन सुमारे 100 प्रवाशांना घेऊन विमानतळावरुन हवेत झेपावणाऱ्या विमानास अपघात (Plane Crash) होऊन 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विमानतळावरुन विमान हवेत झेपावले. काही सेकंदातच त्याचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर काहीच वेळात स्पष्ट झाले की या विमानाचा अपघात झाला आहे. बेक एयर फ्लाइट (Bek Air Flight) 210 या विमानासोबत हा अपघात घडला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.05 वाजता ही घटना घडली.

वृत्तसंस्था एपीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात या विमान अपघातात मृतांची संख्या 9 सांगितली जात आहे. तर, काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात मृतांची संख्या 9 असल्याचे म्हटले आहे. विमान अपघाताचा व्हिडिओही पुढे आला असून, यात दिसते आहे की, विमान कोसळल्यानंतर काही वेळातच विमानात आग भडकली. ही आग काही क्षणांतच पसरली आणि आजूबाजूच्या घरांनाही त्याचा काही प्रमाणात फटका बसला. (हेही वाचा, नांदेड येथे चार्टर विमान धावपट्टीवरुन घसरल्याने अपघात; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली)

ट्विट

व्हिडिओत असेही दिसते आहे की, विमान कोसळल्याची माहिती मिळताच फआयरफायटर्स तातडीने घटनास्थली दाखल होतात आणि मदत, बचावकार्य सुरु करतात. हे कार्य सुरु असताना बाजूच्या लोकांचा आरडाओरडा, रडारड आणि गोंधळही ऐकू येत आहे. हे विमान कजाकिस्तान देशातील सर्वात मोठे शहर आणि या देशाची माजी राजधानी अल्माटी येथून कजाकिस्तानची राजधानी नूरसुल्तानच्या दिशेने झेपावले होते.