Kabul Blast | PC: Twitter

अफगाणिस्तान (Afganisthan) मधील काबूल (Kabul)  मध्ये बॉम्बस्फोट झाला असून 20 जण मृत्यूमुखी तर 40 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. Khair Khana भागामध्ये बुधवारी संध्याकाळी प्रार्थना करताना हा ब्लास्ट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. काबूल मधील इमरजंसी हॉस्पिटलने 27 जखमी रूग्ण आल्याचे आणि त्यामध्येही 7 वर्षीय चिमुकल्याचा समावेश असल्याचं सांगितलं आहे.

काबूल मधील या स्फोटाची अद्याप कुणीही जबाबदारी स्विकारलेली नाही. मीडीया रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीमध्ये Khair Khanna च्या Siddiquiya Mosque ला लक्ष्य करण्यात आले. सुसायडर बॉम्बर यामध्ये होता. तर मशिदीचा इमाम Mullah Amir Mohammad Kabuli होता जो या स्फोटात मृत्युमुखी पडला आहे.

पहा ट्वीट

मागील काही महिन्यामध्ये 3 प्रमुख धार्मिक प्रमुखांना काबूल मध्ये टार्गेट करून ठार करण्यात आले आहे. काही शहरांमध्ये रक्तरंजित प्रकार घडले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असल्याचं स्पष्ट सांगितले आहे. तालिबानच्या दाव्यानुसार त्यांचा अफगाणिस्तान वर पूर्ण ताबा आहे. पण Islamic State कडून नागरिक आणि पोलिसांवर देशभर हल्ले होत आहेत. मागील 2 हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट कडून घेण्यात आली होती.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काबूल ताब्यात घेतल्यानंतर, इस्लामिक अधिकार्‍यांनी महिला आणि मुलींच्या हक्कांवर कठोर निर्बंध लादले आहेत, माध्यमांना दडपले आहे आणि अनियंत्रितपणे ताब्यात घेतले आहे. महिला आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन तालिबान कडून होत असल्याचा IS चा दावा आहे. न्युयॉर्क स्थित एका उजव्या विचारसरणीच्या गटाने केलेल्या दाव्यानुसार तालिबानच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे मोठ्या प्रमाणावर निषेध झाला आहे आणि देशाच्या भीषण मानवतावादी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे.