अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांना पुन्हा कोविड 19 (COVID 19) ची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. Las Vegas ला येताना त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स जारी करत आता बायडन सेल्फ आयसोलेशन मध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. 81 वर्षीय जो बायडन यांना कोविड 19 ची सौम्य लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. Biden यांनी कालच प्रसारित झालेल्या मुलाखतीमध्ये आपण अध्यक्षीय निवडणूकीच्या शर्यतीमधून केवळ medical condition समोर आली तरच बाहेर पडण्याचा विचार करू अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता त्यांचे आजारपण आणि पुढील वाटचालींकडे अनेकांचे लक्ष आहे.
White House press secretary Karine Jean-Pierre यांनी बायडन यांच्या आरोग्याबद्दल माहिती देताना कोविड 19 ची लागण झाल्याने त्यांचे भाषण रद्द करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. बायडन यांनी कोविड 19 ची लस घेतलेली आहे. त्यानंतर बुस्टर डोस देखील घेतला असल्याचं Karine Jean-Pierre यांनी माहिती देताना सांगितलं आहे. तसेच बायडन Delaware ला परतणार असून तेथेच सेल्फ आयसोलेटेड राहतील आणि आपली कामं तेथून करणार आहेत. US Presidential Election 2024: 'राष्ट्राध्यक्ष होताच पहिल्या दिवशी अमेरिकेमधील सर्वात मोठं Deportation Operation सुरू करणार'- Donald Trump .
अमेरिकेत आगामी अध्यक्षीय निवडणूकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये बायडन यांच्या आजारपणाने ट्वीस्ट आला आहे. नुकत्याच झालेल्या डिबेट मध्ये माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन चे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर बायडन यांची कामगिरी निराशाजनक झाल्याचं सांगत काही डोमोक्रॅट्स कडून माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र जो बायडन यांनी आपण निवडणूकीमधून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. पण त्यांचा हा निर्णय कायम राहणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
I tested positive for COVID-19 this afternoon, but I am feeling good and thank everyone for the well wishes.
I will be isolating as I recover, and during this time I will continue to work to get the job done for the American people.
— President Biden (@POTUS) July 17, 2024
जो बायडन यांना कोविड-19 ची लागण झाल्याची घोषणेपूर्वीच, कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी आणि सर्वात हाय-प्रोफाइल डेमोक्रॅट्सपैकी एक Adam Schiff, यांनी जो बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची विनंती केली. त्यांनी लॉस एंजेलिस टाईम्स सोबत बोलताना म्हटलं की निवडणूकीत बायडन ट्र्म्पचा पराभव करू शकतील का? याबद्दल आपण साशंक आहोत. अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबर दिवशी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे.