पायलट मद्यधुंदीत, विमान कंपनीने मागितली प्रवाशांची माफी
संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा

जपानच्या एका विमान कंपनीतील पायलट दारुच्या नशेत असून ही विमान चालवण्यास सज्ज झाला होता. मात्र ही बाब विमान कंपनीला कळली तेव्हा त्यांनी प्रवाशांची माफी मागितली आहे.

पायलट कत्सुतोशी जित्सुवावा असे या तरुणाचे नाव आहे. विमान उड्डाणापूर्वी कत्सुतोशी याने दोन बॉटल्स दारु ढोसली होती. मात्र विमानाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात प्रवेश करण्याआधी त्याच्या बाजूने जाणाऱ्या बस चालकाला त्याने दारु प्यायल्याचा संशय आला. त्यानंतर या बाबत त्याची अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे कत्सुतोशी याची वैद्यकीय तपासणी केल्यास खरच त्याने दारु ढोसल्याचे समोर आले. या घटनेमुळे जपानच्या विमान कंपनीला प्रवाशांसमोर खेद व्यक्त करत माफी मागावी लागली आहे.

तसेच जपानवरुन रवाना होणारे हे विमान टोकियोला जाणार होते. त्यामुळे वेळीच पायलटच्या मद्यधुंदीची गोष्ट लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर पायलट कत्सुतोशी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.