इस्त्रायलने लेबनॉनच्या टायर (Lebanon Tyr Region) प्रांतात हवाई हल्ला (Israeli Airstrikes) केला. ज्यामध्ये किमान 11 लोक ठार आणि 48 जखमी झाले, असे वृत्त एएफपीने लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला (Hezbollah) यांच्यात काही आठवड्यांपासून वाढलेल्या तणावानंतर हे हल्ले झाले आहेत. दरम्यान, अल जझीराने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात इस्रायली लष्करी (Israel Defense Forces) कारवाईमुळे टायर प्रदेशातील अनेक वारसा स्थळांचे (ऐतिहासिक ठिकाणांचे) लक्षणीय नुकसान झाल्यानंतर आणि 16 लोक जखमी झाल्यानंतर अवघ्या काहीच काळात हे हल्ले झाले. वृत्तसंस्था एएनआयनेही याबाबत वृत्त दिले आहे.
बेरूत हल्ल्यात हिजबुल्ला मीडिया प्रमुख ठार
लेबनॉनमधील टायर प्रांतात हल्ला होण्यापूर्वी इस्त्रायलने रुविवारी बैरुत येथे हल्ला केला. ज्यामध्ये ज्यात हिजबुल्लाचे (Hezbollah) प्रवक्ते मोहम्मद अफीफ ठार झाले. टाइम्स ऑफ इस्रायलने इस्रायल डिफेन्स फोर्सेसचा (IDF) हवाला देत या कारवाईला दुजोरा दिला. ज्यात अफीफला "हिजबुल्लाचा वरिष्ठ लष्करी कार्यकर्ता" म्हणून संबोधले गेले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात, आयडीएफने म्हटले आहे की, आफिफचा इस्रायलविरुद्धच्या हिजबुल्लाच्या मोहिमांमध्ये थेट सहभाग होता आणि त्याचे वर्णन "हिजबुल्लाचा मुख्य प्रचारक आणि प्रवक्ता" असे केले आहे. (हेही वाचा, Israeli Airstrike in Beirut: इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रवक्ता Mohammad Afif ठार)
आयडीएफने काय म्हटले?
आयडीएफने आपल्या भूमिकेवर ठाम राहात स्पष्टीकरणादाखल देलेले मुद्दे खालील प्रमाणे:
- हिझबुल्लाहच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्यासाठी अफीफ जबाबदार होता.
- त्याने मानसशास्त्रीय युद्ध केले आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून इस्रायलविरुद्ध हिंसाचाराला उत्तेजन दिले. (हेही वाचा, Advisory for Indian Citizens: लेबनॉनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी, दूतावासाने तात्काळ मायदेशी परतण्याचे नागरिकांना केले आवाहन)
- संघटनेवरील त्यांच्या प्रभावामुळे तो लक्ष्य ठरला.
- इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांच्या निवासस्थानीही घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता.
- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर वाढलेल्या
- तणावाच्या दरम्यान हवाई हल्ले आणि मोहम्मद अफीफ यांची हत्या झाली.
इस्त्राईलच्या डिफेन्स फोर्सचे स्पष्टीकरण
🔴ELIMINATED: Chief Propagandist and Spokesperson of Hezbollah, Mohammed Afif
Afif was a senior Hezbollah military operative, in contact with senior officials and directly involved in advancing and executing Hezbollah’s terrorist activities against Israel.
Messages broadcasted… pic.twitter.com/Iw3WFynSIz
— Israel Defense Forces (@IDF) November 17, 2024
बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराजवळ स्फोट
दरम्यान, नेत्यनाहू यांच्या सिजेरियातील खासगी निवासस्थानाजवळ आग लावणे, घातपाती कृत्य करणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटना घडली तेव्हा नेत्यानाहू किंवा त्यांच्या कुटुंबापैकी इतर कोणताही सदस्य घरात उपस्थित नव्हता. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये हिजबुल्लाच्या ड्रोनने नेतान्याहूच्या निवासस्थानी हल्ला केला होता, ज्यामुळे किरकोळ नुकसान झाले होते. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, ड्रोन शयनगृहाच्या खिडकीवर आदळले, परंतु प्रबलित काचेच्या आत प्रवेश करण्यात अयशस्वी ठरले.
अलिकडील काही काळात इस्त्राईल आणि इतर काही छोट्या-मोठ्या राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. ज्याची सुरुवात पॅसेस्टीनपासूनच्या संघर्षाने झाले. त्यानंतर इराण आणि लेबनॉन हे देशही इस्त्राईलसोबतच्या संघर्षात उतरल आहेत. दरम्यान, हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाल्याने लेबनॉनच्या टायर प्रदेशातील परिस्थिती गंभीर आहे.