इस्रायल हवाई हल्ल्या (Photo: IDF)

इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा येथील हमास या संघटनेच्या अल-अक्सा नावाच्या टीव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त झाली आहे. सोमवारी (13/11/2018) घटलेल्या या घटनेला हमासने देखील दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर इस्लामिक जिहाद इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे एएफजी न्यूजने म्हटले आहे.

या हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. पॅलेस्टाईनमधील हमास ही सर्वात प्रमुख इस्लामी कट्टरवादी संघटना असून याची स्थापना 1987 मध्ये एका जनआंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर ही संघटना पॅलेस्टाईनमधून इस्रायलचे सैन्य हटवण्यासाठी प्रयत्न करीत होती.