इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israel PM Benjamin Netanyahu) यांनी मंगळवारी हमासला कडक इशारा देत आपली भूमिका स्पष्ट की आहे. त्यांनी हमासला कडक शब्दांत इशारा देताना “इस्राएलने हे युद्ध सुरू केले नसले तरी आता आमच्याकडून संपवले जाईल”. हमासचा बदला म्हणून इस्रायलने 3 लाख राखीव सैनिकांना बोलावले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, 1973 च्या योम किप्पूर युद्धानंतर इस्त्राईलने 4 लाख राखीव सैनिकांना पाचारण केल्यानंतर ही सर्वात मोठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
नेत्यानाहू यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं आहे की,"इस्रायल सध्या युद्ध लढत आहे. आम्हाला हे युद्ध नको होते. ते अत्यंत क्रूर पद्धतीने आमच्यावर लादले गेले. हे युद्ध इस्रायलने सुरू केले नसले तरी, इस्रायल ते संपवेल," हमास कडून शनिवारी सकाळी अचानक सुरू झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 2,300 हून अधिक इस्रायली जखमी झाले असून 1200 हून अधिक लोक ठार झाले आहेत.
हमासला इशारा देताना पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल आणि ते दीर्घकाळ लक्षात राहील. हमासला समजेल की त्यांनी आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली आहे. इस्रायलचे अन्य शत्रू देखील पुढील अनेक दशके ही बाब लक्षात ठेवतील. असं म्हटलं आहे. Israel-Hamas war: फ्रांस इस्राईलच्या पाठीशी; Eiffel Tower ला निळी रोषणाई करत दाखवला सपोर्ट .
Israel is at war.
We didn’t want this war.
It was forced upon us in the most brutal and savage way.
But though Israel didn’t start this war, Israel will finish it.
Once, the Jewish people were stateless.
Once, the Jewish people were defenseless.
No longer.
Hamas will… pic.twitter.com/eVECGnzLu3
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) October 9, 2023
ओलीस घेतलेल्या लोकांच्या दुर्दशेबद्दल तो म्हणाला, "हमासने निष्पाप इस्रायलींवर केलेले क्रूर हल्ले धक्कादायक आहेत. कुटुंबांना त्यांच्या घरात मारणे, शेकडो तरुणांना मारणे आणि अनेक महिला, मुले आणि वृद्धांना झालेली मारहाण. लोकांचे अपहरण करून त्यांना बंदी बनवणं हे सारं क्रुर आणि रानटी आहे."
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी प्रतिज्ञा केली की इस्रायली सैन्याने हमासच्या विरोधात "आधी कधीच नाही असे" शक्तीने हल्ले केले आहेत. "हमासशी लढा देऊन, इस्रायल केवळ स्वतःच्या लोकांसाठी लढत नाही. रानटीपणाच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी लढत आहे. इस्रायल हे युद्ध जिंकेल आणि जेव्हा इस्रायल जिंकेल तेव्हा संपूर्ण सुसंस्कृत जग जिंकेल." असेही त्यांनी म्हटलं आहे.