Israel Hamas War: इस्रायलचा हवाई हल्ल्यात 'हमास'चा टॉप कमांडर इब्राहिम बियारी ठार
Israel-Palestine War | (PC - ANI/X)

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाचा आज 25 वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे हे युद्ध थांबवावं, असं अनेक देशांचं म्हणणं आहे. दरम्यान, इस्रायलने आज पुन्हा एकदा गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर इब्राहिम बियारी याचा खात्मा झाल्याचा दावा इस्रायल सैन्याकडून करण्यात करण्यात आला आहे.  (हेही वाचा -  Discrimination In Job: केवळ गोऱ्या आणि तरुण महिलांनाच Flight Attendant म्हणून संधी; विमान कंपनीवर भेदभाव केल्याचा आरोप; खटला दाखल)

इस्रायलच्या संरक्षण दलाचे म्हणणे आहे की, काही वेळापूर्वी गाझा पट्टीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या सेंट्रल जबलिया बटालियनचा कमांडर इब्राहिम बियारी मारला गेला आहे. याशिवाय हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी देखील मारले गेले मारले गेले आणि भूमिगत दहशतवादी बोगदे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे जवळपासच्या अनेक इमारती कोसळल्या, असे लष्कराने सांगितले.

दरम्यान या हवाई हल्ल्यात 50 निष्पाप लोकांचा जीव गेल्याचा आरोप हमासने केला आहे. याशिवाय हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी देखील मारले गेले मारले गेले आणि भूमिगत दहशतवादी बोगदे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे जवळपासच्या अनेक इमारती कोसळल्या, असे लष्कराने सांगितले.