Hamas' top leader, Ismail Haniyeh (Photo Credit X@abhijitmajumder)

हमास (Hamas) चा पॉलिटिकल चीफ इस्माईल हानिया (Ismail Haniyeh) ची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. ईराण च्या इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून त्याची पुष्टी करण्यात आली आहे. IRGC ने दिलेल्या माहितीनुसार, तेहरान मधील त्यांचे घर निशाण्यावर ठेवत स्ट्राईक करून ही हत्या घडवण्यात आली आहे. यामध्ये हमास प्रमुख इस्माईल हानिये आणि त्याच्या बॉडीगार्डची हत्या झाली आहे.

हमास कडून देखील हानिये च्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अद्याप इस्त्राईल कडून या हत्येबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हमास ची लीडरशीप मिळाल्यानंतर हानिये यांनी डिसेंबर 2019 मध्ये गाजा पट्टी सोडली आहे. हानिये च्या देखरेखी मध्ये हमास यांनी मागील वर्षी 7 ऑक्टोबरला इस्त्राईल मध्ये भयंकर हल्ला केलाअ होता. त्याम्ध्ये 1200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या इंतिफादामध्येही इस्माईलने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यामुळे हानियाला इस्रायली सुरक्षा दलांनी अटक केली होती. हानिया सहा महिने इस्रायलच्या  तुरुंगात होते आणि नंतर एका करारानुसार त्यांना 400 इतरांसह लेबनॉनला पाठवण्यात आले. यानंतर 1993 मध्ये ओस्लो करारानंतर हानिया गाझाला परतले होते. 2006 मध्ये गाझामध्ये निवडून आलेल्या हमास सरकारमध्ये हानिया यांना पंतप्रधान बनवले आणि तेव्हापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील तणाव वाढतच गेला.

 टाईम्स ऑफ इस्त्राईलच्या रिपोर्ट नुसार, हानिये च्या हत्येची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. मात्र इराणी सरकारी चॅनल्स कडून इस्त्राईलला दोषी ठरवण्यास सुरूवात केली आहे. हानिये मंगळवारी ईराण चे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन च्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी तेहरानला गेले होते.

इस्रायलचे हेरिटेज मंत्री अमिचाई एलियाहू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत "जगाला या घाणीपासून मुक्त करण्याचा हा योग्य मार्ग आहे. अशा लोकांशी व्यवहार करण्यासाठी शांतता आणि आत्मसमर्पण करार निरुपयोगी आहेत. हानीयेच्या मृत्यूमुळे जग चांगले होईल." असे म्हणाले आहे.