Abu Bakr al-Baghdadi (Photo Credits-Twitter)

ISIS या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी (Abu Bakr al-Baghdadi) जिवंत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये बगदादी जिवंत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी बगदादी हा रुस (Russia) आणि अमेरिका (America) सैन्याच्या हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु ISIS कडून व्हिडिओ जाहीर केल्यानंतर तो जिवंत असल्याचे समोर आले आहे. तर पाच वर्षानंतर बगदादी व्हिडिओद्वारे समोर आला आहे.

ISIS कडून प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओत बगदादी हा तीन लोकांसोबत बोलत असल्याचे दिसून आले आहे. परंतु या तीन व्यक्तींचे चेहरे ब्लर करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बगदादीने कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु ईस्टरच्या वेळी श्रीलंकेत बॉम्ब स्फोट घडवून आणल्यानंतर बगदादी जिवंत असल्याचे दिसले आहे. तर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओतून बगदादी हा श्रीलंका येथील साखळी बॉम्ब स्फोटाचा उल्लेख करत असल्याचे सांगण्यात येत आहे.(श्रीलंकेत बॉम्ब स्फोट हल्ल्यानंतर बुरखा- नकाबवर बंदी, राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचा आदेश)

2015 रोजी बगदादी ह्याला सर्वांनी प्रत्याक्षिक पाहिले होते. तेव्हा बगदादी याची संघटना आयएसआयएसच वर्चस्व पूर्णत: सिरीयावर होते. त्यानंतर अमेरिकेने हल्ला करत आयएसची काही ठिकाणी उध्वस्त केली. त्यामध्ये बगदादी ठार मारला गेल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु आता आयसीसकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओतून तो जिवंत असल्याचे दिसले आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.