मुस्लिम बांधवांसाठी खास असलेला ईद-उल-अजहा (Eid-ul-Azha)हा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आज इराक मधील राजधानी बगदाद मधील सद्र (Sadr)शहरामध्ये एका गर्दीच्या ठिकाणी बॉम्बब्लास्ट झाला आहे. बकरी ईदच्या एक दिवस आधी हा धमाका झाला आहे. सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना यामध्ये टार्गेट करण्यात आले आहे. दरम्यान अद्याप या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही पण यापूर्वी अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेट (Islamic State)ने जबाबदारी घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
एप्रिल महिन्यातही सद्र शहर कार बॉम्बब्लास्टने हादरलं होतं. यामध्ये किमान 4 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान इराकी सैन्याच्या माहितीनुसार, पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी बाजार क्षेत्रासाठी जबाबदारी असलेल्या संघीय पोलिस रेजिमेंट चे कमांडर यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी तपास देखील सुरू असल्याचं म्हटलं आहे. यावर्षी बाजारात अशाप्रकारे बॉम्बब्लास्ट होण्याचा हा तिसरा प्रकार आहे.
मीडीया रीपोर्ट्सनुसार सद्र च्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 8 महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. बाजार परिसरा रक्ताने माखलेला असून त्याची दृष्य विदराक आहेत.