Elnaaz Norouzi Support Anti-Hijab Stir: अभिनेत्री एलनाझ नोरोझी हिचा हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा; सोशल मीडियावर पोस्ट केले अर्धनग्न फोटो, व्हिडिओ
Elnaaz Norouzi | (Photo Credits-Instagram)

इराणमधील हिजाबविरोधी मोहीम हळूहळू जगभर पसरत आहे. या आंदोलनास जगभरातून पाठिंबा मिळत आहे. इराणी अभिनेत्री एलनाझ नोरोझी (Iranian Actress Elnaaz Norouzi ) हिनेही या आंदोलनास मंगळवारी (10 ऑक्टोबर) पाठिंबा (Elnaaz Norouzi Support Anti-Hijab Stir) दर्शवला. विशेष म्हणजे इराणी महिलांना त्यांच्या लढ्यात पाठिंबा दर्शवत ही अभिनेत्री अर्धनग्न झाली. या अभिनेत्रीने अर्धनग्न होतानाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वापरलेल्या अनोख्या पद्धतीने ती चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री एलनाझ नोरोझी हिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री राज्याच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी तिचा हिजाब, नंतर बुरखा आणि नंतर संपूर्ण कपडे काढताना दिसत आहे. तिने तिचे सर्व कपडे काढले. हे करतानाचा व्हिडिओही तिने शूट केल आणि हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला. व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले की, प्रत्येक महिलेला तिच्या शरीरावर स्वातंत्र्य असायला हवे. तिने काय परिधान करावे हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीशिवाय कुणालाही नसावा. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये एलनाझ नोरोझी हिने म्हटले की, प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे! मी नग्नतेचा प्रचार करत नाही, मी निवड स्वातंत्र्याचा प्रचार करत आहे! (हेही वाचा, Iran Hijab Protest: इराणमध्ये महिलांकडून हिजाब जाळत निषेध, आंदोलनाला हिंसक वळण)

महसा अमिनीच्या हत्येमुळे इराणमधील महिला संतप्त झाल्या आहेत. महिलामधून इराणमध्ये संतापाची एक लाटच निर्माण झाली आहे. या लाटेमुळे पाठिमागील काही दिवसांपासून इराण हादरले आहे. 22 वर्षीय कुर्दिश महिला तेहरानच्या भेटीवर असताना पोलिसांनी तिला पकडले आणि 16 सप्टेंबर रोजी पोलिस कोठडीत तिचा मृत्यू झाला.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Elnaaz Norouzi (@iamelnaaz)

पोलिसांनी दावा केला आहे की महिलेने हिजाब नीट घातला नसल्यामुळे तिला पकडण्यात आले. परंतु पोलिस कोठडीत तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे निषेधाची लाट सुरू झाली. तरूणीवर झालेल्या अत्याचारामुळे पोलिसांची चांगलीच गोची झाली. पोलिसांनी ही अटक नैतिक मूल्यांचे पालन करण्याासठी केली होती. पोलिसांनी माहिती देताना म्हटले की, संबंधित तरुणीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.