Gas Stations Across Iran Run Out of Service: इराण (Iran) ला सायबर हल्ल्याचा फटका बसला असून देशभरातील बहुतांश गॅस स्टेशन (Gas Stations) ची सेवा बंद झाली आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायलशी संबंधित Gonjeshke Darande किंवा Predatory Sparrow म्हणून ओळखल्या जाणार्या हॅकिंग गटाने सायबर हल्ल्यात इराणमधील गॅस स्टेशनची सेवा बंद केल्याचा दावा करण्यात येत आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हुथी सारख्या इराण-समर्थित प्रॉक्सींनी हमासबरोबरच्या संघर्षानंतर इस्रायलवर हल्ले तीव्र केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचंही सांगितलं जात आहे. (हेही वाचा - Internet Shut Down in Pakistan: इम्रान खानच्या समर्थकांच्या ऑनलाइन रॅलीपूर्वी पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, Facebook, Instagram आणि YouTube झाले बंद)
BREAKING: Majority of gas stations across Iran out of service after cyberattack - reports pic.twitter.com/j3QSP64YMU
— Insider Paper (@TheInsiderPaper) December 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)