Ebrahim Raisi Dead: हेलिकॉप्टर अपघातात रविवारी, 19 मे रोजी मरण पावलेले इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधन(Ebrahim Raisi Dead)बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी(,PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला. "दु:खाच्या काळात" भारत इराणच्या पाठीशी उभा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. "इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या दुःखद निधनाने अतिशय दु:ख आणि धक्का बसला आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. त्यांच्या कुटुंबासाठी आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा:Ebrahim Raisi: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांचाही समावेश )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)