Israel-Iran Tensions:  इराणने  (Iran) इस्रायलवर ड्रॉन हल्ला (Attack) केला आहे. शनिवारी इस्रायलच्या ड्रोन लॉन्च केले आहेत.मात्र, हे ड्रोन पोहचण्यासाठी काही तास लागतील असं इस्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने सांगितले की, त्यांनी शनिवारी इस्रायलवर १०० पेक्षा जास्त डोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत. या धक्कादायक घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दमास्कसमधील वाणिज्य दूतावासावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलविरुद्ध उडवलेले ड्रोन अमेरिकन सैन्याने पाडले असल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी शनिवारी दिले. या घटनेनंतर जॉर्डनमध्ये आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली आहे. हेही वाचा- सिडनी शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार आणि चाकू हल्ला

१ एप्रिलला सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इराणच्या दूतावासावर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला होता. याच गोष्टीचे प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने इस्रायलवर हा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलच नाही, तर लेबनान आणि जॉर्डनने सुध्दा एअर स्पेस पूर्णपणे बंद केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने बरीच बॅलिस्टिक मिसाइल्स सुध्दा डागल्याचा IDFला संशय आहे.

दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत.  इस्रायलने उत्तरी गोलान हाइट्स, दक्षिणी इस्रायलय अन्य क्षेत्रातील लोकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बॉम्ब शेल्टरच्या जवळ राहण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेन सैन्याने इस्रायलच्या दिशेने जाणारे इराणचे ड्रोन पाडलं होते अशी माहिती आहे. पण किती ड्रोन पाडली याचा खुलासा करू शकले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)