Germany Church Shooting: जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरात बंदुकधारींनी अंदाधुंद गोळीबार (Shooting) केल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये सुमारे 6 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा गोळीबार उत्तर जर्मनीतील हॅम्बर्ग शहरात झाला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथके मदत आणि बचावकार्य करत आहेत. पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, "अनेक लोक गंभीर जखमी झाले असून काहींचा मृत्यूही झाला आहे. सध्या गुन्ह्याच्या हेतूबद्दल कोणतीही विश्वसनीय माहिती नाही."
पोलिसांनी आपत्ती अलर्ट अॅप वापरून परिसरातील नागरिकांना धोक्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी हल्ला झालेल्या इमारतीजवळील रस्ता बंद केला आहे. पोलिसांनी सांगितले की, गुन्हेगार पळून जाण्याचे कोणतेही संकेत नाहीत. गुन्हेगार इमारतीत लपला असावा किंवा त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाजही अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. (हेही वाचा - LosAngeles Firing: लॉस एंजेलिस येथे पोलिस अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या; घटनास्थळी SWAT घटनास्थळी दाखल, तपास सुरु)
हा हल्ला कोणत्या उद्देशाने करण्यात आला आहे, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेनंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. माहितीनुसार, हॅम्बुर्ग शहरातील अल्स्टरडॉर्फ जिल्ह्यातील एका चर्चमध्ये अज्ञात लोकांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये अनेकांना गोळ्या लागल्या. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
At least six people are dead and several more injured after a shooting in the northern German city of Hamburg, Focus Online media reported, citing the fire service: Reuters
— ANI (@ANI) March 9, 2023
एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, इमारतीच्या शीर्षस्थानी दिसणारा माणूस हा गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. या तीन मजली इमारतीत गुरुवारी सायंकाळी एक कार्यक्रम सुरू होता. शहराचे महापौर पीटर चंचार यांनी ट्विटरवरून गोळीबाराबद्दल शोक व्यक्त केला. डिसेंबर 2016 मध्ये बर्लिनच्या ख्रिसमस मार्केटमध्ये इस्लामिक अतिरेक्यांनी केलेल्या सर्वात भयानक ट्रकच्या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ट्युनिशियातील हल्लेखोर ISIS या संघटनेचा समर्थक होता.