Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Firing in Chicago: अमेरिकेतील शिकागो येथे बुधवारी रात्री एका रेस्टॉरंटबाहेर झालेल्या गोळीबारात (Chicago Firing) 4 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा शिकागोच्या रिव्हर नॉर्थ भागात गोळीबाराची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी रेस्टॉरंटबाहेर उभ्या असलेल्या गर्दीवर गोळीबार केला आणि लगेचच वाहनातून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सध्या कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. संशयिताला पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 21 ते 32 वयोगटातील 13 महिला आणि 5 पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. नॉर्थवेस्टर्न मेडिसिनचे प्रवक्ते क्रिस किंग म्हणाले की, आपत्कालीन विभाग गोळीबारात जखमी झालेल्या अनेक लोकांवर उपचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 50 वर्षांत या अशा प्रकारच्या गोळीबाराच्या घटनांमध्ये 15 लाखांहून अधिक अमेरिकन लोकांनी आपला जीव गमावला आहे.