
Blue Whale Suicide Game: 'ब्लू व्हेल गेम' खेळताना एका तरुणाने जीव गमावला आहे. ही घटना अमेरिकत घडली आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात त्याने आत्महत्या केली होती. ब्लू व्हेल चॅलेज या ऑनलाईन गेममुळे त्याने आत्महत्या केली असा संशय आला आहे. या गेमला सुसाईड गेम असेही म्हणतात.मृत तरुण २० वर्षाचा होता. तो मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. ८ मार्च रोजी घरात मृतावस्थेत सापडला होता. (हेही वाचा- सिंगापूरच्या बाजारातून हटवण्यात आला 'एव्हरेस्ट फिश करी मसाला')
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिस्टल काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी प्रवक्ते ग्रेम मिलियट म्हणाले की, आत्महत्या म्हणून हे प्रकरण तपासत आहोत. सुरुवातीला ही घटना हत्या असल्याचे संशय येत होते. विद्यार्थ्याची ओळख पटवली आहे. या आधी अनेक विचित्र आणि धोकादायक खेळामुळे तरुणांचा मृत्यू झाला आहे. ब्लू व्हेल चॅलेज हा एक ऑनलाईन गेम आहे ज्यामध्ये सहभागी झालेल्यांना 50 दिवसांसाठी दररोज एक आव्हान दिले जाते. ही आव्हाने हळूहळू अधिक कठीण होत जातात आणि अंतिम टप्प्यात तो जीवाशी खेळला जातो.
मृत तरुणाने आव्हान पूर्ण करण्यासाठी दोन मिनिटे श्वास रोखून धरला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. भारतात 'ब्लू व्हेल चॅलेंज'मुळे झालेला हा पहिला मृत्यू असल्याचे मानले जात आहे. भारत सरकारने गेमवर बंदी घालण्याचा विचार केला होता परंतु नंतर तपशीलवार सूचना जारी करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले होते की "ब्लू व्हेल गेम (आत्महत्या गेम) आत्महत्येसाठी प्रवृत्त आहे."