भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी त्वरित चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची अमेरिकेची ग्वाही
jahnavi kandula

भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला हिच्या अपघाती मृत्यूप्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई होणार आहे. ही चौकशी करण्याची ग्वाही अमेरिका सरकारने दिली आहे. पोलिसांच्या वेगवान वाहनाने धडक दिल्याने 23 वर्षीय जान्हवीचा मृत्यू झाला होता. जान्हवीचा अपघाती मृत्यू आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता हे दोन्ही मुद्दे भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू यांनी उच्चस्तरिय पातळीवर उपस्थित करून तातडीने कारवाईची मागणी केल्यानंतर अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. (हेही वाचा - Shocking! पेन्शन मिळवण्यासाठी पत्नीचा मृतदेह तब्बल 5 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला; आरोपी पतीला अटक, जाणून घ्या सविस्तर)

हा अपघात गेल्या 23 जानेवारीला घडला होता. पोलिसांचे गस्ती वाहन केवीन डेव्ह हा पोलीस अधिकारी हा 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवत होता. जान्हवी रस्ता ओलांडत असताना या गाडीने तिला धडक दिली गेली. या अपघाताचा त्वरित तपास करण्याचे आणि त्यास जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन बायडेन प्रशासनाने भारत सरकारला दिले आहे. सिएटल पोलीस विभागाने प्रसारित केलेल्या चित्रफितीत, डॅनियल ऑडरर हा अधिकारी या प्राणघातक अपघाताबद्दल हसत असल्याचे दिसते. त्याने  या प्रकरणाच्या तपासाबद्दलही असंवेदनशीलता व्यक्त केली.