
Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये (Canada) एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा गोळीबाराच्या (Firing) घटनेत मृत्यू झाला. ही विद्यार्थीनी कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. त्यानंतर एका गाडीतून अंदाधुंद गोळीबार झाला आणि त्यातील एक गोळी मुलीला लागली. या दुर्दैवी घटनेत मुलीला आपला जीव गमवावा लागला. मृत मुलीचे नाव हरसिमरत रंधावा असे आहे. ती ओंटारियोमधील हॅमिल्टन येथील मोहॉक कॉलेजमध्ये विद्यार्थिनी होती.
या घटनेचा तपास हॅमिल्टन पोलिस करत आहेत. मृत विद्यार्थी रंधावा निर्दोष असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देताना, टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने शुक्रवारी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'ओंटारियोमधील हॅमिल्टन येथे भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या दुःखद मृत्यूने आम्ही सर्वजण खूप दुःखी आहोत.' (हेही वाचा -Indian Student Found Dead In Scotland: स्कॉटलंडमधील नदीत सापडला 22 वर्षीय बेपत्ता भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह)
दोन वाहनांमध्ये गोळीबार -
स्थानिक पोलिसांच्या मते, विद्यार्थिनी दोन वाहनांच्या गोळीबाराच्या घटनेत बळी पडली. पोलिस हत्येचा तपास करत आहेत. पोलिस अधिकारी मृत मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. मृतांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
विद्यार्थिनीच्या छातीत लागली गोळी -
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हॅमिल्टनमधील अप्पर जेम्स आणि साउथ बेंड रस्त्यांजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना विद्यार्थिनी छातीत गोळी लागल्याने जखमी अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Indian Student Died in US: नवीन बंदूक साफ करतांना लागली गोळी, तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू)
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, काळ्या कारमधील एका प्रवाशाने पांढऱ्या सेडानवर गोळीबार केला. या घटनेत बस स्टँडवर उभ्या असलेल्या एका मुलीला गोळी लागली. गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच काळ्या कारमधील प्रवासी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस पथक या घटनेशी संबंधित अधिक पुरावे गोळा करत आहे. पोलीस संध्याकाळी 7.15 ते 7.45 दरम्यानच्या डॅशकॅम किंवा सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.