Gulf of Aden

एडनच्या खाडीमध्ये 'एमव्ही मार्लिन लुआंडा' (Marlin Luanda) शिपवर हल्ल्याची खबर मिळाली. त्यानंतर आयएनएस विशाखापट्टणम् (INS Visakhapatnam) तैनात करण्यात आलेलं आहे. त्यापूर्वी शिप मार्लिन लुआंडाकडून एक धोक्याचा संदेश पाठवण्यात आलेला होता. 26 जानेवारी रोजी हौथींनी लक्ष्य केलेल्या मर्लिन लुआंडा या ब्रिटिश तेल टँकरमध्ये बावीस भारतीय आहेत. भारतीय नौदल अग्निशमन प्रयत्नांना मदत करत आहे. नौदलाने सांगितले की त्यांचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, INS विशाखापट्टणम, 26 जानेवारीच्या रात्री तेल टँकरच्या त्रासदायक कॉलला प्रतिसाद म्हणून एडनच्या आखातात (Gulf of Aden) तैनात करण्यात आले होते.

पाहा पोस्ट -

 

भारतीय नौदलाने सांगितलं की,  जानेवारी रोजी रात्री 'मार्लिन लुआंडा'वरुन धोक्याचा कॉल मिळाला होता. त्यावरुन एडनच्या खाडीत आयएनएस विशाखापट्टणम् तैनात करण्यात आलं. नौदलाने पुढे सांगितलं, संकटग्रस्त मर्चंट वेसलला मदत पोहोचविण्यात येतेय. आयएनएस विशाखापट्टणम् याद्वारे अग्मिशमन उपकरणं तैनात करण्यात आलेली आहेत.

 

पाहा पोस्ट -

 

तेल जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुथी बंडखोरांनी स्वीकारली आहे. हुथीचे प्रवक्ते याह्या सारिया यांनी एका निवेदनात म्हटलंय की, आमचा प्रहार थेट होता. युनायटेड स्टेटनेही एमव्ही मार्लिन लुआंडावरील हल्ल्याची पुष्टी केली आहे.