Indian Independance Day 2020 Celebration: कॅनडाच्या Niagara Falls वर फडकणार भारताचा तिरंगा; CN Tower, Toronto Sign  वरही 74 व्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन
Niagara falls | photo Credits: Twitter/ Niagara falls

यंदा 15 ऑगस्ट दिवशी भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान कॅनडाच्या प्रसिद्ध नायगरा फॉल्स (Niagara Falls) वर स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पहिल्यांदा ध्वजारोहण केले जाणार आहे. दरम्यान यंदा जगभरात कोरोना संकट असल्याने कॅनडामध्ये देखील Ottawa Indian High Commission सह Toronto आणि Vancouver मध्ये काऊन्सलेट मधील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये बदल झाले आहे. प्रत्यक्ष ध्वजारोहणाऐवजी आता या कर्यक्रमांचे आयोजन ऑनलाईन माध्यमातून केले जाणार आहे.

नायगरा फॉल्स सोबतच आता कॅनडामध्ये 553 मीटर उंच असलेल्या CN Tower वर देखील ध्वाजारोहण होणार आहे. दरम्यान कॅनडामधील अजून एक आकर्षण असलेल्या सीटी हॉल जवळील three-dimensional Toronto sign जवळ देखील भारताचा झेंडा तिरंग्याच्या लाईट्समध्ये रोषणाई केली जाणार आहे. या रोषणाईला सुरूवात विकेंडपासून सुरूवात होणार आहे. तर नायगरा धबधब्यावर 15 ऑगस्तच्या संध्याकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. रविवारी (16 ऑगस्ट) दिवशी CN Tower वर ध्वजारोहण होईल. तर Toronto sign वरील रोषणाई दोन्ही दिवशी ठेवली जाणार आहे.

HT शी बोलताना कॅनडामध्ये नायगरा फॉल्स , CN Tower आणि Toronto sign वर अशाप्रकारे भारताचा तिरंगा फडकणं ही अभिमानाची बाब असल्याची भावना India’s Consul General to Toronto अपूर्व श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. Indian Independence Day 2020 Date, Theme, Significance: भारताचा यंदा 74 वा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या या दिवसाचंं महत्त्व आणि थीम.

दरवर्षी कॅनडामध्ये भारतीय समाज एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. मागील वर्षी डाऊन टाऊनच्या कार्यक्रमात 85,000 लोकं एकत्र जमले होते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे ऑनलाईन माध्यमातून केले जाईल. व्हर्च्युअल परेड होईल. 10 मिनिटांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध संस्कृतींपासून खाद्यपदार्थांचा समावेश केला जाणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यामध्ये यंदा Taste of India या कार्यक्रम देखील होणार आहे. त्यामध्ये देशातील विविध राज्यांत खास असलेल्या पदार्थांची रेसिपी सेलिब्रिटी शेफ्स कडून ऑनलाईन शेअर केली जाईल.