कॅनडामधील (Canada) पोलिसांनी दोन मुलांसह आठ जणांचे मृतदेह बाहेर काढले, जे कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात मरण पावले. या मृतांमध्ये एका भारतीय कुटुंबातील (Indian family) सदस्यांचा समावेश आहे जे सेंट लॉरेन्स नदी (St Lawrence River) ओलांडून कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती रॉयटर्सने दिली. मृतांमध्ये सहा प्रौढ आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये दोन आणखी व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील एक कॅनडा तर दुसरा रोमानियाचा नागरिक असल्याचे समजले. कॅनडा-अमेरिका सीमा असलेल्या सेंट लॉरेन्स नदीच्या दलदलीच्या परिसरात हे मृतदेह सापडले.
मृतांमध्ये रोमानिया आणि भारतातील दोन कुटुंबांचा समावेश आहे अमेरिका-कॅनडा सीमेवरील मोहॉक प्रदेश अकवेसास्ने येथील त्सी स्नेहने येथील दलदलीत हे मृतदेह सापडले. पोलिसांनी गुरुवारी सहा मृतदेह ताब्यात घेतले असून बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला. एका पोलीस हेलिकॉप्टरने दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले.
आता पर्यंत एकूण आठ मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. सर्वजण कॅनडातून अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. एक मूल तीन वर्षांपेक्षा कमी वयाचा होता आणि त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट होता. दुसरे अर्भक देखील कॅनेडियन नागरिक होते, असे स्थानिक पोलिस प्रमुखांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. हे मृतदेह दोन कुटुंबातील असल्याचे मानले जात आहे, एक रोमानियन वंशाचा आणि एक भारतीय वंशाचा,
दरम्यान ही घटना दुर्दैवी असून या घटनेची संपुर्ण माहिती आम्ही घेऊन अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रयत्न करु असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले.