Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

Imran Khan Gets Bail: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना शुक्रवारी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणासह (Al-Qadir Trust Case) त्यांच्याविरुद्धच्या सर्व खटल्यांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला. आदेशानुसार, खान यांना 17 मे पर्यंत अटक होणार नाही. न्यायालयाने माजी पंतप्रधानांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने IHC आवारातून त्याची अटक अवैध आणि बेकायदेशीर ठरवल्याच्या एका दिवसानंतर हा निकाल आला आहे.

तत्पूर्वी, उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होताच गदारोळ झाला. सुनावणीदरम्यान इम्रानच्या समर्थक वकिलांनी इमरानच्या घोषणांनी कोर्टरूममध्ये गोंधळ घातला. त्यामुळे न्यायाधीश उठून निघून गेले. दरम्यान, गुरुवारी सुप्रीम कोर्टाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली आणि त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्यांना उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. (हेही वाचा - Imran Khan’s Arrest Illegal: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; झालेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर)

सुनावणीपूर्वी इम्रान खान पोलिस लाईन्समध्ये हजर होते. त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत इस्लामाबाद न्यायालयात नेण्यात आले. दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादचा श्रीनगर महामार्ग बंद केला होता. इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अल-कादिर ट्रस्ट खटल्याच्या सुनावणीदरम्यान इम्रान खान म्हणाले की, काहीही झाले तरी देश सोडणार नाही. हा माझा देश आहे, ही माझी सेना आहे, ही माझी जनता आहे. यापूर्वी इम्रान खानला मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पाक रेंजर्सच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर निदर्शने सुरू झाली होती, त्यानंतर पीटीआय कार्यकर्त्यांनी देशाच्या विविध भागात जाळपोळ केली होती. यानंतर काल, गुरुवारी, 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने इम्रानची अटक बेकायदेशीर ठरवत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना निमलष्करी दलाने मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली. खंडपीठाने नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (एनएबी) स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत इम्रानला हजर करण्याचे निर्देश दिले होते. खान यांना कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटकेविरोधात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या अध्यक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने त्याला पाक रेंजर्सनी ज्या पद्धतीने अटक केली त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांना हजर करण्याचे आदेश दिले.

पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) इम्रानच्या सुटकेबाबत सरन्यायाधीशांवर हल्लाबोल केला. पक्षाच्या मुख्य संयोजक मरियम नवाज म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने तिजोरी लुटणाऱ्यांना सोडून दिले आहे. एका गुन्हेगाराची सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला तर देशाला कोण वाचवणार? सरन्यायाधीश बांदियाल यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयमध्ये सामील व्हावे, असंही ते म्हणाले.